जळगावात २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

एप्रिल 17, 2021 4:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील गोपाळपुरा भागामधील २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नितीन प्रदीप सोनवणे (वय २३, रा. गोपाळपुरा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

शहरातील गोपाळपुरा पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या नितीन सोनवणे या तरुणाचे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटंुबीयांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. नितीन याने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी डॉ. भोळे यांनी दिलेल्या खबरीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज इंद्रेकर तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now