जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । सध्या आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात आता एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथील २३ वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. नितीन शालीग्राम पाटील (वय २३, रा. वैजनाथ ता. एरंडोल) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली? याबाबत अद्यापही कळू शकले नाहीय. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे नेमकी घटना?
धरणगाव तालुक्यातील वैजनाथ येथील नितीन शालीग्राम पाटील हा तरुण कुटुंबियांसोबत वासव्यास असून त्याचा मोठा भाऊ पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला असून नितीन हा घरी वडीलांना शेतीकामात मदत करीत होता.
शेतात रात्रीची लाईट असल्याने नितीन हा रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. आज सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारास नितीनचे काका भगवान पाटील हे त्यांच्या शेतात गेल्याने त्यांना नितीनने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती आपल्या भावाला दिली.
दरम्यान त्यांनी घटनास्थळी धाव घेत नितीनचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. त्याची तपासणी केली असता, त्याला मयत घोषीत केले. मयत नितीनच्या पश्चात त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, विवाहित बहिण असा परिवार आहे.
हे देखील वाचा :
- विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी पसार झालेल्या वधूला अटक; सात दिवसाची पोलिस कोठडी
- Gold Silver Rate : सोन-चांदी पुन्हा महागली, आजचे ताजे दर जाणून घ्या
- दुचाकी अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू
- तळेगावात सर्पदंशाने ४ वर्षीय बालिकेचा मृत्यू
- Petrol Diesel Rate : कच्च्या तेलाचे दर पुन्हा भडकले ; वाचा आजचा पेट्रोल-डिझेलचा दर
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज