⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

औरंगाबाद – जळगाव जिल्ह्यांचा संपर्क तुटला

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ ।  औरंगाबादमध्ये शनिवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने सोयगावात पूर आला आहे. या पुरामुळे सोयगाव मार्गे पाचोरा जोडणारा राज्यमार्ग बंद पडला आहे. त्यामुळे औरंगाबाद जळगाव या दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. सध्या नदीच्या काठावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून असलेल्या पावसानं औरंगाबाद जिल्ह्यात चांगलंच थैमान माजवला आहे. जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे सोयगाव तालुक्यातील तिडका नदीला तुफान पूर आला आहे. मध्यरात्रीतून पावसाचे चांगलाच जोर पकडल्यामुळे सोयगावात अनेक ठिकाणी पूराचे पाणी शिरले आहे.

02 ऑक्टोबर रोजी पहाटे 03.25 वाजता औरंगाबाद शहरात हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर 03.38 दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर आभाळात एका-मागून एक वीजा कडाडल्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे निसर्गाचं आणखी किती भयाण रौद्ररुप पहायला मिळणार, या धास्तीने औरंगाबादकरांची झोप उडाली. पहाटे 03.38 ला सुरु झालेला पाऊस 04.03 वाजेपर्यंत अखंड बरसत होता.

औरंगाबाद शहरातील नारेगाव आणि पिसादेवी परिसरात रात्रीच्या पावसामुळे पाणी घुसरेल आहे. अनेक दुकाने आणि घरांमध्ये रात्रीतून पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तसेच दुकानातील आणि घरातील वस्तू, मालाचे मोठे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी गावात आणि रस्त्यावर घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत.