⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 16 ते 27 सप्टेंबर दरम्यान 22 गाड्या रद्द

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 16 ते 27 सप्टेंबर दरम्यान 22 गाड्या रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ संप्टेंबर २०२४ । एकीकडे सणासुदीचे दिवस तोंडावर आले असून यातच रेल्वेकडून तांत्रिक कामांसाठी गाड्या रद्द केल्या जात आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अशातच आता रेल्वेने पुन्हा एकदा डझनभर गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. यातील अनेक रेल्वे गाड्या या भुसावळ मार्गे धावणारे आहेत.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १६ ते २७ सप्टेंबरपर्यंत सुमारे २२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. रद्द झालेल्या गाड्यांचे कारण देखभाल करण्यासाठी करण्यात आले आहे.

या गाड्या रद्द करण्यात आल्या
ट्रेन क्रमांक 11651 जबलपूर-सिंगरौली एक्सप्रेस- 16 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत रद्द राहील.
ट्रेन क्रमांक 11652 सिंगरौली-जबलपूर एक्सप्रेस- 17 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत रद्द राहील.
गाडी क्रमांक ०३२२५ दानापूर-सिकंदराबाद स्पेशल – १९ सप्टेंबर रोजी रद्द होईल.
ट्रेन क्रमांक ०३२२६ सिकंदराबाद-दानापूर स्पेशल २२ सप्टेंबर रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक ०५२९३ मुझफ्फरपूर-सिकंदराबाद स्पेशल – १७ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर रोजी रद्द होईल.
ट्रेन क्रमांक ०५२९४ सिकंदराबाद-मुझफ्फरपूर स्पेशल – १९ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी रद्द होईल.
गाडी क्रमांक ०७०२१ सिकंदराबाद-दानापूर स्पेशल – १९ सप्टेंबर रोजी रद्द होईल.
गाडी क्रमांक ०७०२२ दानापूर-सिकंदराबाद स्पेशल – २० सप्टेंबर रोजी रद्द होईल.

ट्रेन क्रमांक ०७६४७ सिकंदराबाद-दानापूर स्पेशल – १४ सप्टेंबर आणि २१ सप्टेंबर रोजी रद्द राहील.
गाडी क्रमांक ०७६४८ दानापूर-सिकंदराबाद स्पेशल – १६ सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक ०९०२५ वलसाड-दानापूर स्पेशल – १६ सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर रोजी रद्द होईल.
गाडी क्रमांक ०९०२६ दानापूर-वलसाड स्पेशल- १७ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक 09033 उधना-बरौनी स्पेशल – 16 सप्टेंबर, 18 सप्टेंबर, 23 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर रोजी रद्द होईल.
ट्रेन क्रमांक 09034 बरौनी-उधना स्पेशल – 18 सप्टेंबर, 20 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी रद्द केली जाईल.
ट्रेन क्रमांक 09045 उधना-पाटणा स्पेशल – 20 सप्टेंबर रोजी रद्द होईल.
ट्रेन क्रमांक ०९०४६ पाटणा-उधना स्पेशल – २१ सप्टेंबर रोजी रद्द होईल.

गाडी क्रमांक ०९०६३ वापी-दानापूर स्पेशल – १७ सप्टेंबर, २० सप्टेंबर, २१ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर रोजी रद्द होईल.
गाडी क्रमांक ०९०६४ दानापूर-भेस्तान स्पेशल – १९ सप्टेंबर, २२ सप्टेंबर, २३ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी रद्द होईल.
गाडी क्रमांक ०९३४३ डॉ. आंबेडकरनगर-पाटणा विशेष – १९ सप्टेंबर रोजी रद्द होईल.
गाडी क्रमांक ०९३४४ पाटणा-डॉ. आंबेडकरनगर विशेष – 20 सप्टेंबर रोजी रद्द होणार आहे.
गाडी क्रमांक ०३४१७ मालदा टाउन-उधना स्पेशल – १५ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबरपर्यंत रद्द राहील.
ट्रेन क्रमांक ०३४१८ उधना-मालदा टाऊन स्पेशल – १७ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबरपर्यंत रद्द राहील.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.