⁠ 
रविवार, नोव्हेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | सरपंचांसह २१६ ग्रामपंचायत सदस्यांचे पद धोक्यात; हे आहे कारण?

सरपंचांसह २१६ ग्रामपंचायत सदस्यांचे पद धोक्यात; हे आहे कारण?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १५ फेब्रुवारी २०२३ | अमळनेर तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींमधील काही सरपंचांसह तब्बल २१६ सदस्यांवर पुन्हा एकदा अपात्रतेची तलवार डोक्यावर आली आहे. सर्व २१६ लोकप्रतिनिधींना नोटिसा बजावण्यात आल्या असून आठ दिवसात खुलासा मागविण्यात आला आहे. यामुळे अमळनेर तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नोटिसा बजावण्याचे मुख्य कारण म्हणजे, राखीव प्रवर्गात निवडून आल्यानंतरही मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही.

जानेवारी २०२१ मध्ये तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांच्या मागास प्रवर्गात, भटक्या विमुक्त जाती, इतर मागासवर्ग आदी राखीव जागांवर उमेदवारी अर्ज भरताना जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक होते. मात्र, काहींनी जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याने त्यांच्या पोचपावतीवर अर्ज ग्राह्य धरण्यात आले.

निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या आत वर्षाची आणखी मुदत वाढवून दिली. मात्र त्यांनी अद्यापही जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. निवडून आल्यानंतर वर्षभराच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, तर त्या व्यक्तीची निवड रद्द होते, असा शासनाचा नियम आहे. यामुळे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी २१६ सदस्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन उत्तरासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे.

या ६७ ग्रामपंचायतींमधील २१६ सदस्य
कलाली, निभोरा, जळोद, पिपळी प्र. ज. पिंगळवाडे, मेहेरगाव, सात्री, हिंगोणे खुर्द प्र. ज. मुडी प्र. अ. ग्रुप, गांधली, पिळोदे, करणखेडा, गलवाडे खुर्द, गलवाडे बुदूक, एकरुखी जुनोने, ढेकू खुर्द, ग्रुप, कुम्हे बुद्रूक, देवगाव देवळी ग्रुप, गडखांब ग्रुप, म्हसले टाकरखेडे, पळासदळे, खेडी खुर्द प्र. अ.. कडारी खुर्द, रामेश्वर खुर्द, रामेश्वर बुदूक, सारबेटे खुर्द, सारबेटे बुक, खेडी खुर्द सिम प्र. ज. खवशी बुद्धक, दापोरी बटुक, नांदी, धावडे, सावखेडा, पातोंडा, सोनखेडी, पाडसे, वासरे ग्रुप, एकलहरे, कळंबे, चौबारी, धानोरे ग्रुप, बोदर्डे, सबगव्हाण, कळमसरे, बोहरे, एकतास, तांदळी, निम, पाडळसरे शहापूर, प्रगणे डागरी, लोण खुर्द, लोण चारम, मांडळ जवखेडा, पिपळे बुद्रुक झाडी, वाघोदे, आटाळे आड, आंचलवाडी, कावपित्री, हिंगोणे खुर्द प्र. अमळनेर, फापोरे बुद्रुक, शिरुड.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.