आई शेतात अन् एकुलता एक मुलाने उचललं ‘हे’ टोकाचं पाऊल..

ऑगस्ट 31, 2021 10:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । जळगाव जिल्ह्यात तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव तालुक्यातील वडली येथे एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. नितीन श्यामराव पाटील (वय २१) असे मृताचे नाव असून त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

vadali nitin jpg webp

याबाबत असे कि,  चाळीगाव तालुक्यातील रांजणगाव येथील मुळ रहिवाशी असलेला नितीन, आई छायाबाई व वडील हे वडली येथे मामाच्या गावाला पाच वर्षापासून वास्तव्याला आले होते. गेल्या वर्षीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. सोमवारी आई शेतात गेली होती, दुपारी घरी आली असता हा प्रकार उघडकीस आला.

त्यांनी भाऊ तथा माजी सरपंच पांडूरंग सोनू पवार यांना घटनेची माहिती दिली. नितीन हा कंपनीत कामाला जात होता. दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. म्हसावद दूरक्षेत्राच्या पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now