चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षाची शिक्षा

फेब्रुवारी 17, 2022 9:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । शहरातील एका परिसरात राहणाऱ्या कुटुंबाच्या पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून चार वर्षीय चिमुकलीला उचलून नेत नराधमाने अत्याचार केला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी नराधम राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी (वय-22, रा. राजीव गांधीनगर) याला जिल्हा न्यायालयाने मंगळवारी २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून ७५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच दंडाच्या रकमेतील ७० हजार रुपये हे पिडीतेला देण्याचे आदेश न्या.एस.जी.ठुबे यांनी दिले आहे. पोक्सो कायद्यांतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली.

court order jpg webp

शहरातील एका परिसरात पिडीत चिमुकली वडीलांसह पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. १७ ऑक्टोबर २०१८ रोजी या शेडमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने राणासिंग जुन्नी याने प्रवेश केला. शेडच्या दरवाजाची आतील कडी उघडून त्याने शेडमधील मोबाईल चोरले. तसेच याठिकाणी झोपलेल्या ४ वर्षाच्या चिमुकलीला उचलून मोहाडी गावाकडे घेवून गेला. यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या काटेरी झुडपात मोकळ्या जागी नेवून तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी पिडीतेच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन दि.१८ ऑक्टोबर २०१८ रोजी तालुका पोलीस ठाण्यात राणासिंग जुन्नी या नराधामाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी नराधाम आरोपी राणासिंग जुन्नी याला अटक केली. याप्रकरणी अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयासमोर खटल्याला सुरुवात झाली. या खटल्यात सरकारपक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात ४ वर्षाच्या चिमुकल्या पिडीतेसह तिचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अंमलदार, डॉक्टर यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. तसेच तपासी अंमलदार तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी तपासात योग्य काम केल्यामुळे तसेच सरकारपक्षापक्षाचा प्रभावी युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरीत आरोपी राणासिंग जुन्नी याला शिक्षा सुनावण्यात आली.

असे कलम अशी शिक्षा

आरोपी राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी याला भादंवि कलम 461,380 आणि बाललैंगिक अधिनियम 2012 चे कलम 4 ब नुसार दोषी धरुन 20 वर्ष सश्रम कारावास व 75 हजार रुपये दंड तो न भरल्यास अडीच वर्षाची साधी कारावासाची शिक्षा. तसेच 75 हजार दंडाच्या रकमेतून पिडीतेला 70 हजार द्यावे. तसेच भादवि कलम 461 साठी 1 वर्षाची साधी शिक्षा व 5 हजार रुपये दंड न भरल्यास 3 महिने साधी कारवासाची शिक्षा, कलम 380 नुसार 3 वर्षाची साधी शिक्षा व 5 हजार रुपये दंड न भरल्यास 6 महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पोक्सो कायद्यांतर्गंत जिल्ह्यात पहिलीच शिक्षा

पोक्सो कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल झाल्यानंतर ४ वर्षाच्या चिमुकली सोबत नराधामाने केलेले कृत्य हे समाजातील नात्यांच्या व माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचा प्रभावी युक्तीवाद सरकारपक्षाकडून अ‍ॅड.वैशाली महाजन यांनी केला. तसेच न्यायालयासमोर सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारावर आरोपी राणासिंग जुन्नी याला दोषी ठरवित २० वर्षांची शिक्षा सुनावली. दरम्यान, जिल्हा व सत्र न्यायालयाने जळगावात पहिल्यांदाच पोक्सो अंतर्गत ही शिक्षा देण्यात आली आहे. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय तुषार मिस्तरी तर केस वॉच म्हणून मिथून पाटील यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now