म्हसावद येथे २० वर्षीय तरुणीची आत्महत्या

मार्च 28, 2021 4:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२१ । जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील २० वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनीवारी सायंकाळी उघडकीस आलीय. सोनाली बाळू महाजन (वय-२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाहीय.

crime

सोनाली महाजन ही आपल्या आईवडीलांसह म्हसावद येथे राहते. वडील खासगी वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २७ मार्च रोजी घरात कोणीही नसतांना सोनाली महाजन हीने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आला. नेमके आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. २८ मार्च रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now