जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशात आज दुपारी जळगाव शहरातील एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. कोमल ज्ञानेश्वर कांबाळे (वय-२०) या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, शहरातील भारत नगर मध्ये आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास असलेली कोमल कांबळे हिने दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरी कुणीही नसतांना कोमल हिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली.कोमल हिचे वडील खासगी लक्झरी चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात.
हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. युवतीने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. घटनेची माहिती मिळाताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. डॉ. रेणुका भंगाळे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा प्राथमिक तपास पोहेका संजय झाल्टे आणि महिला पोलीस कर्मचारी रेश्मा मालवणकर हे करीत आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- BRO Bharti : सीमा रस्ते संघटनेत 10 पाससाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 411 पदांसाठी भरती
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन