मुंबई,भुसावळ साठी २० साप्ताहिक विशेष गाड्या

एप्रिल 25, 2022 5:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । मुंबईहुन भुसावळ कडे येण्यासाठी आता नवीन २० साप्ताहिक विशेष गाड्या सुरु होणार आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मऊ दरम्यान विशेष शुल्कासह २० अतिजलद साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या सुरू हाेणार आहेत.

रेल्वे

गाडी क्रमांक ०१०५१ अतिजलद साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २८ एप्रिल ते ३० जूनदरम्यान (१० फेऱ्या) दर गुरुवारी ५.१५ वाजता सुटेल आणि मऊ येथे दुसऱ्या दिवशी १२.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०५२ अतिजलद साप्ताहिक विशेष गाडी मऊ येथून ३० एप्रिल ते २ जुलैदरम्यान (१० फेऱ्या) दर शनिवारी ५.४५ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२ वाजता पोहोचेल. या गाड्याना कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, राणी लक्ष्मीबाई स्टेशन, ओराई, कानपूर, फतेहपूर असे थांबे असणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now