गुन्हेमहाराष्ट्र

नागपूर रेल्वे मार्गावर मालगाडीचे 20 डबे रुळावरून घसरले ; भुसावळहुन धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ- नागपूर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अमरावती नजीकच्या मालखेड रेल्वे गावाजवळ कोळशाने भरलेल्या मालवाहू रेल्वे गाडीचे 20 डबे रात्री 11 वाजताच्या सुमारास रेल्वे रूळावरून घसरले. यामुळे भुसावळ वर्धा मेमू गाडी आज रद्द करण्यात आलेली आहे. यासोबतच अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या असून या अपघातामुळे नागपूर-मुंबईची वाहतूक नरखेडमार्गे वळवण्यात आली आहे. दिवाळसाठी गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशाना याचा फटका बसला आहे. दरम्यान

रात्री 11 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. एकापाठोपाठ एक 15-20 डबे रुळावरून घसरू लागल्याने खूप मोठा आवाज आला. मालगाडीचे इंजिन रुळाच्या एका बाजूला घसरले तर काही डबे रुळावरच आडवे झाले. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.ऐन दिवाळीत हा अपघात झाल्यामुळे रेल्वे विभागाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहेत. काल रात्रीपासूनच रेल्वे विभागातर्फे या मार्गावर दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. सकाळी सुर्योदयानंतर या कामाने वेग घेतला आहे.

अपघात स्थळावर रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि तंत्रज्ञ तातडीने दाखल झाले. सध्या 200 कर्मचारी येथील दुरुस्तीचे काम करत आहेत. लवकरच हा मार्ग सुरळीत होईल, असे आश्वासन येथील अधिकाऱ्यांनी दिले आहे.

पुढील गाड्या रद्द झाल्या आहेत-
11122 वर्धा-भुसावळ JCO 24.10.2022
12140 नागपूर-CSMT JCO 23.10.2022 (धामणगाव ते नागपूर परत आणि रद्द)
12119 अमरावती-नागपूर JCO 24.10.2022
11040 गोंदिया-कोल्हापूर JCO 24.10.2022
01372 वर्धा-अमरावती JCO 24.10.2022
17642 नरखेर-काचेगुडा जेसीओ २४.१०.२०२२
11121 भुसावळ-वर्धा JCO 24.10.2022
12106 गोंदिया-CSMT JCO 24.10.2022
12136 नागपूर-पुणे JCO 24.10.2022
12120 अजनी-अमरावती JCO 24.10.2022
12140 नागपूर-CSMT JCO 24.10.2022
01374 नागपूर-वर्धा JCO 24.10.2022

Related Articles

Back to top button