जळगाव जिल्हा

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभाग सक्षम – बी.जी.शेखर पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ सप्टेंबर २०२१ |  येणाऱ्या गणेशोत्सव नागरीकांनी कोरोनाचे नियम पाळुन शांततेत साजरा करावा कायदा सुव्यवस्थेचा सर्वांनी सन्मान करावा.सज्जनांना सन्मानाची वागणूक दिली जाईल.  गुन्हेगारांवर कारवाई करण्यात पोलिस प्रशासन सक्षम आहे.प्रतिष्ठीत नागरीकांनी निर्भय होऊन शांतता टिकवण्यासाठी समोर यावे. आपले विचार समाजा समोर ठेवावे. युवकांनी विना कारण कोणत्याही भानगडीत पडू नये .त्यांनी शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आवाहन नासिक पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बि. जी. शेखर पाटील यांनी रावेरच्या शांतता कमेटीच्या बैठकीत केले.

 

 

गुन्हेगारी प्रवृत्ती पासुन लांब राहावे;डॉ मुंढे

सूजमल-सुखलम असलेला रावेर तालुक्यातील युवकांनी गुन्हेगारी प्रवृत्ती पासुन लांब राहावे. कुठल्याही चुकीच्या कामांमध्ये सहभाग घेऊ नये .यासाठी पालकांनी त्यांच्याकडे लक्ष ठेवावे .त्यांना चांगले शिक्षण देऊन समाजहीताचे कार्य त्यांच्या हातुन करावे. तसेच पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलेल्या सोबत फक्त पाच ते सहा जणांना पोलिस स्टेशनमध्ये प्रवेश द्यावा. जास्त गर्दी केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे शांतता बैठकीत केले

 

 

बैठकीत यांची होती उपस्थिती

अप्पर पोलिस अधिक्षक, चंद्रकांत गवळी उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लवांड नगराध्यक्ष दारा महम्मद, तहसीलदार महेश पवार, पोलिस निरिक्षक कैलास नागरे, फौजदार मनोहर जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, शहराध्यक्ष महेमुद शेख ,नगर सेवक प्रल्हाद महाजन, आसिफ महंमद, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील,  गणेश मंळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, अशोक शिंदे, दिलीप कांबळे, अय्युब पहेलवान, इ.जे. महाजन ,अँड योगेश गजरे,  सुधाकर महाजन,उमेश महाजन आदी शांतता कमीटीचे सदस्य उपस्थित होते.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button