जळगाव जिल्हा
सीए प्रतिमा नमीत जैन यांना नारी सन्मान पुरस्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२४ । जळगाव येथील चार्टर्ड अकाउंटंट प्रतिमा नमीत जैन यांना जागतिक महिला दिनानिमीत्त भारतीय जैन संघटना आणि जैन युवा फाउंडेशनने नारी सन्मान २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वाध्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समाजातील उच्च शिक्षीत तसेच सामाजिक कार्यात विशेष कार्य करणा—या प्रतिमा जैन यांना सन्मानित करण्यात आले. प्रतिमा जैन या अरिहंत मार्गी जैन महिला संघटनेच्या माजी अध्यक्ष सुनिता जैन तसेच उद्योजक सुनिल जैन यांच्या सुनबाई तसेच सी ए नमित जैन यांच्या पत्नी आहे. औद्यागिक तसेच सामाजिक क्षैत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.