⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

..म्हणूनच एकनाथ खडसेंनी आक्रोश मोर्चा काढला ; आ. मंगेश चव्हाणांचा पुन्हा हल्लाबोल

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२३ । जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आ. मंगेश चव्हाण यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला. परिवाराला वाचविण्यासाठी एकनाथराव खडसे यांनी आक्रोश मोर्चा काढल्याची टीका आ. मंगेश चव्हाण यांनी केली. शेतकऱ्यांसाठी आक्रोश कामी आणि आ. खडसे यांचा आक्रोश जास्त होता, असंही ते म्हणाले.

जिल्हा दुध संघात आयोजीत पत्रकार परिषदेत आमदार तथा जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी विविध विषयावर संवाद साधला. यावेळी त्यांनी एकाथराव खडसे यांच्या कार्यकाळात जिल्हा दूध संघ हा तोट्यात होता. सुमारे रु. ९.६० कोटी तोटा होता. मात्र आम्ही डिसेंबर २०२२ पासून कार्यरत झाल्यानंतर अनावश्यक खर्चाना कात्री लावून तसेच अनेक कठोर प्रशासकीय निर्णय घेवून व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी ठोस पावले उचलून सदरचा तोटा रु. ६.७२ कोटी पर्यंत कमी करण्यात यश मिळवून दूध संघ हा नफ्यात आणला.

दिनांक १ एप्रिल, २०२३ पासून संचालक मंडळाने प्राथमिक दूध उत्पादक संस्थांच्या व्यवस्थापन शुल्कात सुमारे २० टक्के वाढ केली. सदरची प्राथमिक दूध उत्पादक संस्थांची मागणी मागील ९ वर्षापासून प्रलंबीत होती. त्यामुळे वार्षिक किमान १ कोटी ६४ लाखांचा फायदा सबंधित संस्थांना होत आहे. तसेच BMC धारकांच्या शुल्कामध्ये वाढ करण्यात यावी अशी गेल्या ७ वर्षांपासून मागणी होती, त्यात आम्ही १ एप्रिल २०२३ पासून ४२ टक्क्यांनी वाढ केली.

मार्केटमधे दूध खरेदी दर कमी होत असतांना दूध उत्पादकांना दुधाचे वाजवी दर मिळावेत, दूध उत्पादकांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अर्थात नामदार धाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार दिनांक २२ जून, २०२३ रोजी पुणे येथे दूध उत्पादकास किफाईतशीर दर मिळावेत या हेतूने सर्व दूध संघ, खाजगी संस्था आणि व्यावसायिक यांची एकत्र बैठक आयोजीत केली होती.

सदर बैठकीत एक समिती मंत्री महोदयांनी गठीत केली होती. त्या समितीमधे जळगांव दूध संघाचा समावेश झाल्यामूळे मी स्वतः त्या समितीचा सदस्य होतो. त्यावेळेस इतर दूध संघ, व्यावसाईक सुमारे रु. ३२.०० ते ३३.०० प्रती लीटर दर अदा करीत होते. तथापी संघाने जिल्हयातील दूध उत्पादकांच्या आर्थिक परिस्थीतीचा विचार करुन किमान दर रु. ३४.०२ प्रती लीटर प्रमाणे दुधाची खरेदी केलेली आहे अशीही माहिती आ. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.