प्रवाशांनो लक्ष द्या ! मध्य रेल्वे सोडणार १८२ उन्हाळी विशेष गाड्या
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । उन्हाळी सुटीचा हंगामात लक्षात घेऊन प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) आणि बलिया-गोरखपूर दरम्यान १८२ उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. त्यामुळे प्रवाशांची माेठी गैरसाेय दूर हाेणार आहे.
मुंबई-बलिया त्रै-साप्ताहिक विशेष (७८ फेऱ्या) :
गाडी क्रमांक ०१०२५ विशेष १ एप्रिल ते २९ जूनपर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी २.१५ वाजता सुटून बलिया येथे तिसऱ्या दिवशी मध्यरात्री १.४५ वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांम ०१०२६ विशेष गाडी ३ एप्रिल ते १ जुलैपर्यंत दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी बलिया येथून दुपारी ३.१५ वाजता सुटून ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ३.३५ वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, महाराज छत्रसाल स्टेशन छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकुटधाम कारवी, माणिकपूर, प्रयागराज, ग्यानपूर, वाराणसी, औंडिहार, मऊ आणि रसडा या स्थानकावर थांबणार आहे.
मुंबई-गोरखपूर आठवड्यातून ४ वेळा (१०४ फेऱ्या) :
गाडी क्र. ०१०२७ विशेष गाडी (आठवड्यातून ४ वेळा) २ एप्रिल ते ३० जूनपर्यंत दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी एलटीटीहून दुपारी २.१५ वाजता सुटून गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी पहाटे पोहोचेल. गाडी क्र. ०१०२८ विशेष गाडी (आठवड्यातून ४ वेळा) ४ एप्रिल २ जुलैपर्यंत दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी गोरखपूर येथून दुपारी २.२५ वाजता सुटून ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ३.३५ वाजता पोहोचणार आहे.
असे राहतील डबे :
गाडी क्रमांक ०१०२५/०१०२५६ आणि गाडी क्र. ०१०२७/०१०२८ या गाड्यांची संरचनेत एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी अशी राहणार आहे.