भादलीजवळील ब्लॉकमुळे १८ रेल्वे गाड्या रद्द, तर ९ गाड्या विलंबाने धावणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । जर तुम्ही रेल्वेने आज भुसावळ मार्गे नागपूर, पुणे आणि मुंबईकडे जाणार असाल तर ही बातमी तुमच्याकामाची आहे. कारण भुसावळ विभागातील भादली रेल्वे स्थानकावर चौथ्या रेल्वे लाइनचे काम सुरु असल्यामुळे आज सोमवार आणि उद्या मंगळवारी असे दोन दिवस १८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले. तर ९ गाड्या विभागातील वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवल्या जातील. दुसरीकडे नागपूर विभागात देखील ब्लाॅक घेतल्याने विदर्भ व महाराष्ट्र एक्स्प्रेस नागपूरला शॉर्ट टर्मिनेट केल्या आहे.

ब्लाॅकच्या काळात ९ गाड्यांना विविध रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात येईल. त्यात अमृतसर-मुंबई ही गाडी ७ रोजी दुपारी ४.४५ ते ५.४५ पर्यंत भुसावळ, हटिया-पुणे गाडी ७ रोजी भुसावळला सायंकाळी ५ ते ५.५० थांबेल, गाेरखपूर-एलटीटी सोमवारी भुसावळला सायंकाळी ५ ते ५.५५, जयनगर-एलटीटी गाडी ७ रोजी सायंकाळी ५ ते ५.४० या वेळेत दुसखेडा, गाेंदिया-काेल्हापूर गाडी ७ रोजी सायंकाळी ५.१५ ते ५.५५ या वेळेत वरणगाव, बंगळुरू-दिल्ली ही गाडी ७ रोजी सायंकाळी ५ ते ५.४० या वेळात जळगाव थांबेल.

या गाड्यांच्या मार्गात केला आहे बदल
हावडा-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस ७ ते ९ नोव्हेंबर काळात कटनी, जबलपूर, इटारसी, खंडवा, भुसावळ मार्गे धावेल. मुंबई-हावडा दुरंताे एक्स्प्रेस ६ ते ८ या काळात भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनीमार्गे धावेल. पुणे-हावडा दुरंताे एक्स्प्रेस ७ रोजी भुसावळ, कटनी, जबलपूर मार्गे जाईल. शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस ही गाडी ६ ते ८ नाेव्हेंबरदरम्यान कटनी, जबलपूर, इटारसी, खंडवा, भुसावळमार्गे जाईल. एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस ६ ते ८ नाेव्हेंबरदरम्यान भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी मार्गे धावेल.

या गाड्या झाल्या रद्द
दाेन दिवस रद्द असलेल्या गाड्यांमध्ये भुसावळ-इगतपुरी, इगतपुरी-भुसावळ (दि.८), भुसावळ-देवळाली, देवळाली-भुसावळ (दि.८), सूरत-भुसावळ (दि.७), भुसावळ-सूरत (दि.८), सूरत-भुसावळ (दि.८), भुसावळ-सूरत पॅसेंजर (दि.८), नंदूरबार-भुसावळ, भुसावळ-नंदूरबार, भुसावळ-कटनी या गाड्या मंगळवारी (दि.८) रद्द आहे. कटनी-भुसावळ (दि.९), अमरावती-मुंबई एक्स्प्रेस (दि.७), मुंबई-अमरावती, पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस व भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, नागपूर-पुणे या गाड्या मंगळवारी तर पुणे-नागपूर एक्स्प्रेस ही गाडी बुधवारी रद्द आहे.

नागपूर विभागात गाड्या शाॅर्ट टर्मिनेट :
नागपूर विभागातील ब्लॉकमुळे तीन दिवस गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. त्यात मुंबई-गाेंदिया विदर्भ एक्स्प्रेस ६ ते ८ नाेव्हेंबरदरम्यान नागपूरलाच थांबवण्यात येईल. गाेंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस ६ ते ८ नाेव्हेंबर या काळात नागपूर येथून सुटेल. काेल्हापूर-गाेंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ६ ते ८ नाेव्हेंबर या काळात शाॅर्ट टर्मिनेट असेल.