यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच हतनूरचे ‘इतके’ दरवाजे उघडले ; तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जुलै 28, 2025 11:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२५ । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या मध्य प्रदेश व विदर्भातील तापी व पूर्णा नदीच्या खोऱ्यात झालेल्या पावसामुळे आवक वाढून धरणाचे १८ दरवाजे एक मीटर उंचीने उघडून विसर्ग करण्यात आला.

hatnur dam jpg webp

दरम्यान यापूर्वी काल धरणाचे २२ दरवाजे उघण्यात आले होते. यंदाच्या मान्सून हंगामात पहिल्यांदाच ४१ पैकी २२ दरवाजे उघडून वेगाने विसर्ग सुरू होता. मात्र आज सकाळी यातील चार दरवाजे करण्यात आले. सध्या तापी नदीला पूर आला असून काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला

मागच्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती. त्यातच हतनूरच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस नसल्याने धरणाचे केवळ २ ते ४ गेट उघडण्यात आले होते. मात्र आता गेल्या दोन चार दिवसात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात आवक वाढली.

यामुळे शनिवारी (दि २६) मध्यरात्री १ वाजता १० दरवाजे एक मीटरने उघडून विसर्ग झाला. यानंतर काल रविवारी पहाटे ५ वाजता १८ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. सकाळी १० वाजता २०, तर दुपारी ३ वाजता २२ दरवाजे एक मीटरने उघडून तापी नदीत विसर्ग झाला. यंदाच्या पावसाळ्यात हतनूर धरणाचे २२ दरवाजे पहिल्यांदा उघडले गेले. मात्र आज पहाटे उघडण्यात आलेल्या २२ पैकी ४ दरवाजे बंद करून सध्या १८ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. ३३१५४ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सध्या तापी नदीला पूर आला असून यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now