⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | प्रवाशांच्या दिलासा! ‘या’ 18 उन्हाळी विशेष गाड्यांच्या मुदतीत वाढ, भुसावळहुन धावणाऱ्या या गाड्यांचा समावेश

प्रवाशांच्या दिलासा! ‘या’ 18 उन्हाळी विशेष गाड्यांच्या मुदतीत वाढ, भुसावळहुन धावणाऱ्या या गाड्यांचा समावेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२३ । उन्हाळ्यात प्रवासाची मोठी मागणी लक्षात घेता रेल्वेने सात जोड विशेष गाड्यांची मुदत वाढवली आहे. आता या गाड्या पूर्वीपेक्षा जास्त वेळ धावतील. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांमध्ये हा बदल केला आहे. या गाड्या वेगवेगळ्या मार्गांवर धावतात. यातील काही रेल्वे गाड्या भुसावळून धावणाऱ्या आहेत.

भुसावळहुन धावणाऱ्या या गाड्यांच्या मुदतीत वाढ?

त्यात ०९०५१ मुंबई सेंट्रल-भुसावळ एक्सप्रेस ही विशेष गाडी २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत धावेल. ही गाडी रविवारी, मंगळवार आणि शुक्रवारी धावते. तर ०९०५२ भुसावळ – मुंबई सेंट्रल ही गाडी ०१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत धावेल. ही गाडी सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावते.

या 18 विशेष गाड्यांची वेळ मर्यादा वाढवण्यात आली ट्रेन क्रमांक ०९१८५ मुंबई सेंट्रल – कानपूर अन्वरगंज साप्ताहिक विशेष 24 जून 2023 पर्यंत धावणार होती परंतु आता ती 1 जुलै 2023 पर्यंत धावेल
ट्रेन क्र. ०९१८६ कानपूर अन्वरगंज – मुंबई सेंट्रल साप्ताहिक स्पेशल पूर्वी २५ जून २०२३ पर्यंत धावणार होती पण आता ती २ जुलै २०२३ पर्यंत धावेल
ट्रेन क्रमांक ०५०५४ वांद्रे टर्मिनस – गोरखपूर स्पेशल याआधी २४ जून २०२३ पर्यंत धावणार होती, पण आता ती १ जुलै २०२३ पर्यंत धावणार आहे.
ट्रेन क्रमांक 05053 गोरखपूर – वांद्रे टर्मिनस स्पेशल याआधी 23 जून 2023 रोजी धावणार होती परंतु आता ती 30 जून 2023 पर्यंत धावेल.
ट्रेन क्रमांक 04126 वांद्रे टर्मिनस – सुभेदारगंज साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल पूर्वी 27 जून 2023 पर्यंत धावणार होती परंतु आता 26 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे
ट्रेन क्रमांक ०४१२५ सुभेदारगंज – वांद्रे टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन पूर्वी २६ जून २०२३ रोजी धावणार होती परंतु आता २५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक 09117 सुरत – सुभेदारगंज साप्ताहिक स्पेशल आधी 30 जूनपर्यंत धावणार होती, परंतु आता ती 25 ऑगस्टपर्यंत धावेल.
सुभेदारगंज ते सुरत ही साप्ताहिक स्पेशल ट्रेन क्रमांक ०९११८ १ जुलैपर्यंत धावणार होती, मात्र आता ती २६ ऑगस्टपर्यंत धावणार आहे.
ट्रेन क्रमांक 01906 अहमदाबाद ते कानपूर सेंट्रल साप्ताहिक स्पेशल पूर्वी 27 जूनपर्यंत धावणार होती, परंतु आता ती 26 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.
ट्रेन क्रमांक 01905 कानपूर सेंट्रल ते अहमदाबाद साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 26 जूनपर्यंत धावणार होती, मात्र आता ती 25 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.
ट्रेन क्रमांक 04166 अहमदाबाद ते आग्रा कॅंट साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन पूर्वी 29 जूनपर्यंत धावणार होती, परंतु आता ती 28 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.
ट्रेन क्रमांक ०४१६५ आग्रा कॅंट – अहमदाबाद साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल पूर्वी २८ जून २०२३ पर्यंत धावणार होती परंतु आता ती २७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ०४१६८ अहमदाबाद-आग्रा कॅंट साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल जी पूर्वी २६ जूनपर्यंत धावणार होती, परंतु आता २५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.
ट्रेन क्रमांक ०४१६७ आग्रा कॅंट – अहमदाबाद साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल पूर्वी २५ जूनपर्यंत धावणार होती, पण आता ती २४ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ०९३२१ इंदूर – श्री माता वैष्णोदेवी कटरा साप्ताहिक स्पेशल पूर्वी २८ जून रोजी धावणार होती, परंतु आता ती ३० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ०९३२२ श्री माता वैष्णो देवी कटरा – इंदूर साप्ताहिक स्पेशल पूर्वी ३० जूनपर्यंत धावणार होती, पण आता १ सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ०९३२४ इंदूर – पुणे साप्ताहिक स्पेशल याआधी २९ जून २०२३ पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०९३२३ पुणे-इंदूर साप्ताहिक स्पेशल याआधी ३० जून २०२३ पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती १ सप्टेंबरपर्यंत वाढवली जाईल

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.