जागेचा प्रश्न सुटणार ! मुंबई-पुण्याहून गोरखपूर आणि दानापूरसाठी धावणार १७६ विशेष गाड्या

मार्च 16, 2026 12:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई व पुणे येथून गोरखपूर आणि दानापूरकडे जाणाऱ्या एकूण १७६ विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यामुळे जागेचा प्रश्न सुटणार असून या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव आणि भुसावळ महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

train

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गोरखपूरसाठी गाडी ०१०७९ ही विशेष गाडी १० ते ३१ मार्च दरम्यान दररोज रात्री १०.३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता गोरखपूरला पोहोचेल. तर ०१०८० ही परतीची गाडी १२ मार्च ते २ एप्रिल दरम्यान गोरखपूरहून दुपारी २.३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता मुंबईला पोहोचेल. या मार्गावर एकूण ४४ सेवा चालवण्यात येणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते दानापूर विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०११४३ ही विशेष गाडी १० ते ३१ मार्च दरम्यान सकाळी १०.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता दानापूरला पोहोचेल. तर ०११४४ ही गाडी ११ मार्च ते १ एप्रिल दरम्यान दानापूरहून रात्री ९.३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता मुंबईला पोहोचेल.

पुणे ते गोरखपूर विशेष पुणे येथून ०९४१५ ही गाडी १० ते ३१ मार्च दरम्यान दररोज सकाळी ६.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४ वाजता गोरखपूरला पोहोचेल. तर ०१४१६ ही गाडी ११ मार्च ते१ एप्रिल दरम्यान गोरखपूरहून सायंकाळी ५.३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ३.१५ वाजता पुण्यात पोहोचेल.

पुणे ते दानापूर विशेष पुणे येथून ०१४४९ ही गाडी १० ते ३१ मार्च दरम्यान दुपारी ३.३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे २.४५ वाजता दानापूरला पोहोचेल. तर ०१४५० ही गाडी १२ मार्च ते २ एप्रिल दरम्यान दानापूरहून पहाटे ५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता पुण्यात पोहोचेल.

आरक्षणाची सुविधा :
या सर्व विशेष गाड्यांसाठी तिकीट आरक्षण संगणकीकृत केंद्रांवर तसेच रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनारक्षित डब्यांसाठी तिकीट बुकिंग प्रणालीद्वारे करता येणार असून प्रवाशांना अॅपद्वारेही बुकिंग करता येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now