जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकार?
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मीनगर परिसरात १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांचा वास्तव्याला आहे. ६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पवयीन मुलगी ही टायपिंगच्या क्लासला जाऊन येते असे आईला सांगून क्लासला गेली. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न आल्याने तिच्या आई व नातेवाईकांनी तिच्या क्लास आणि मैत्रिणींकडे शोधाशोध केली परंतु ती आढळून आली नाही.

गुन्हा दाखल
यासंदर्भात अल्पवयीन मुलीच्या आईने रविवार ९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !










