गुन्हेजळगाव जिल्हाजळगाव शहर
१७ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविले
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । शहरातील हरिविठ्ठल नगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द रामानंदनगर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अल्पवयीन मुलगी ही हरिविठ्ठल नगरात कुटुंबासह वास्तव्यास आहे. जेवण झाल्यानंतर मंगळवारी रात्री ११ वाजता कुटुंबीय झोपून गेले होते. बुधवारी पहाटे अल्पवयीन मुलीच्या वडिलांना जाग आल्यानंतर त्यांना मुलगी झोपलेल्या जागेवर दिसून आली नाही. त्यांनी इतर भागांमध्ये तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. अखेर वडिलांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक
- धक्कादायक ! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, रुग्णालयात दाखल
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात