⁠ 
बुधवार, मे 8, 2024

बैल धुण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा धरणात बुडून मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । नितीन ठक्कर । बैलाला धुण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज सोमवारी सकाळी एरंडोल तालुक्यातील खर्ची येथे धरणात घडली आहे. सागर ज्ञानेश्‍वर माळी (वय १५) असे मयत मुलाचे नाव आहे.

याबाबत असे की, आज सोमवारी पोळा असल्याने सर्व ग्रामस्थ बैल धुण्यासाठी धरणावर गेले होते. ग्रामस्थांसोबत सागर माळी हा सुध्दा एकदाच घरचे बैल धुण्यासाठी गेला. बैल धुणे झाल्यानंतर सागर धरणात पोहायला लागला. गाळात पाय फसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

घटना लक्षात आल्यानंतरत्याचसोबत असलेल्या मुलांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. याठिकाणच्या इतर ग्रामस्थांनी तात्काळ तलावाकडे धाव घेत त्याला बाहेर काढून तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच खोटेनगरजवळ वाटेतच सागरचा मृत्यू झाला.

घटनेने खर्ची बुद्रुक आणि जळगावावर शोककळा पसरली आहे. सागर आर.आर.विद्यालयात इयत्ता ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचा पश्चात आई, वडील, थोरली बहीण, लहान भाऊ असा परिवार आहे.