जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुने २०२५ । प्रमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलींसह तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना चोपडा तालुक्यातून समोर आलीय. जिथे अल्पवयीनाशी प्रेमसंबंध ठेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून 14 वर्षीय पीडीता गर्भवती राहिली. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली.

चोपडा तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन पीडीता वास्तव्याला आहे. ऑक्टोबर 2024 पासून परिसरात राहणारा ज्ञानेश्वर उर्फ दादू सुनिल भील (21) याने पीडीतेसोबत प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर शारिरीक संबंध ठेवले. अत्याचारातून पीडीता गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पीडीता मुलीसह तिच्या नातेवाईकांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.

त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी ज्ञानेश्वर भील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे करीत आहे.







