जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । अवघ्या १४ वर्षीय मुलीने विहीरात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जाडगाव शिवारात उघडकीस आलीय. सरीता उर्फ वैशाली गुरुदास कुभार (वय १४) असे या मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, मूळ जळगावमधील खंडेराव नगर पिंप्राळा, येथील रहिवाशी असलेले गुरुदास धोंडू कुंभार हे आपल्या पत्नी व चार मुलासह जाडगाव शिवारात असलेल्या शेतातील विनोद भागवत कुंभार यांच्या विट्ट भटीवर मोलमजुरीसाठी आले होते. त्यांचि मोठी मूलगी सरीता उर्फ वैशाली गुरुदास कुभार (वय १४) ही १३ शुक्रवार रोजी सायंकाळच्या वेळी नैसर्गिक विधिसाठी जात असल्याचे सांगून मावस बहीण मनिषा सोबत बाजूच्या शेताकडे जाऊ लागल्या अचानक सरिता उर्फ वैशाली ही जोराने पळत सुटली व अतूल भंगाळे यांच्या शेतातील विहिरात उडी टाकली.
यावेळी सोबत असलेल्या मनिषा हि घराकडे धावत येऊन सदर घटना तिच्या वडिलांना सांगितली. यावेळी वैशालीच्या वडिलांसह विटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांनी त्या विहिरीकडे धाव घेऊन तिला पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र शोध लागला नसल्याने पट्टीचा पाण्यात पोहणारा जामसिंग पारधी याने विहीरीच्या तळाशी जाऊन वैशालीला बाहेर काढले.
दरम्यान तिला उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला मयत मुलीचे वडील गुरुदास धोंडू कुंभार यांच्या खबरी नुसार अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सह उप निरिक्षक परशुराम दळवी हे करीत आहे.