जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । भुसावळ मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील (Bhusawal division) नांदगाव स्थानकाजवळ (दुपारी १.१५ ते सायंकाळी ५.१० या वेळात पादचारी पुलाचे काम होणार आहे. यामुळे मंगळवार व बुधवार (२१ व २२ डिसेंबर) असे दाेन दिवस चार तासांचा ब्लाॅक घेण्यात आला आहे. त्यामुळे अप-डाऊन मार्गावरील तब्बल १३ रेल्वे गाड्या विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर थांबवल्या जातील.
या गाड्यांमध्ये डाउन मार्गावरील बंगळुरू-न्यू दिल्ली एक्स्प्रेस हिसवळ स्थानकावर दुपारी ३.२० ते ५.१५ अशी १.५५ तास, एलटीटी-छपरा एक्स्प्रेस (मंगळवार, गुरूवार व शनिवार) दुपारी ३.२५ ते ५.१५ अशी १.५० तास मनमाड, नांदेड-निजामुद्दीन (मंगळवार) व यशवंतपूर-चंदीगड या गाड्या मनमाड स्थानकावर ३.३५ ते ५.२५ या वेळात १.५० तास, मुंबई-पटना (मंगळवार, शुक्रवार) ही गाडी ३.२५ ते ५.१५ अशी १.५० तास समीट स्थानक, एलटीटी-जय नगर एक्स्प्रेस लासलगाव स्थानकावर दुपारी ३.४० ते ५.१५ अशी १.३५ तास, एलटीटी-कामाख्य

गाडी निफाड स्थानकावर ४.४० ते ५.१५ अशी ३५ मिनिटे, एर्नाकुलम-निजामुद्दी न एक्स्प्रेस सायंकाळी ५.१० ते ५.२० अशी १० मिनिटे कसबे सुकेने स्थानकावर थांबवण्यात येईल. अप मार्गावरील स्थिती अप मार्गावरील न्यू दिल्ली-बंगळुरू एक्स्प्रेस दुपारी ३.०४ ते सायंकाळी ५.१५ म्हणजे २.१० तास पिंपरखेड स्थानक, प्रयागराज-एलटीटी (मंगळवार, गुरूवार) ही गाडी दुपारी ३.२० ते ५.१५ या १.५५ तास न्यायडोंगरी स्थानक, हावडा- मुंबई एक्स्प्रेस दुपारी ३.३० ते ५.१५ या १.४५ तास हिरापूर स्थानक, लखनऊ-मुंबई एक्स्प्रेस ३.३५ ते ५.१५ अशी १.४० तास चाळीसगाव, हावडा-मुंबई एक्स्प्रेस ३.५५ ते ५.१५ अशी १.२० तास वाघळी, वाराणसी-एलटीटी कजगाव स्थानकावर ४.३० ते ५.१५ अशी ४५ मिनिटे.

हे देखील वाचा :
- प्रवाशांनो लक्ष द्या! १५ ऑगस्टपासून बडनेरा–नाशिक रोड मेमूच्या सेवेत ‘हा’ मोठा बदल
- बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग
- गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
- जळगावात सायबर सुरक्षा जनजागृतीविषयी इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटी संपन्न
- जळगाव डाक विभागातर्फे १८ ऑगस्ट रोजी विभागीय पेन्शन अदालत












