छठ पूजेसाठी धावणार 124 स्पेशल रेल्वे गाड्या, भुसावळमार्गे ‘या’ गाड्यांचा समावेश
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । सणासुदीच्या काळात प्रवाशांना योग्य वेळी त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे प्रशासन अनेक विशेष गाड्या चालवत आहेत. विशेषत: छठच्या निमित्ताने यूपी आणि बिहारच्या भाविकांच्या सोयीस्करसाठी रेल्वेने १२४ छठ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहेत. यात काही गाड्या भुसावळ मार्गे धावणाऱ्या आहेत. विशेष गाड्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.
124 पूजा विशेष गाड्या चालवल्या
छठ महापर्वातील गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून १२४ पूजा विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. येथे आम्ही तुम्हाला देशाच्या विविध भागांतून बिहार आणि यूपीकडे येणा-या छठ पूजा विशेष गाड्यांची यादी देत आहोत. महापूजेनंतर परतण्यासाठी आरक्षणाच्या उर्वरित जागांची माहिती रेल्वेने शेअर केली आहे.
भुसावळ मार्गे धावणार या गाड्या
01043 लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूर पूजा विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस 30 ऑक्टोबरपर्यंत दर रविवारी आणि गुरुवारी दुपारी 12.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 9.15 वाजता समस्तीपूरला पोहोचेल.
०१०४४ समस्तीपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस पूजा विशेष गाडी ३१ ऑक्टोबरपर्यंत दर सोमवार आणि शुक्रवारी समस्तीपूर येथून ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०७.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
०५५२९ जयनगर – लोकमान्य टिळक टर्मिनस पूजा विशेष गाडी ८ नोव्हेंबरपर्यंत दर मंगळवारी रात्री ११.५० वाजता जयनगरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
०५५३० लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर पूजा विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ११ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी सकाळी ००.१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता जयनगरला पोहोचेल.