जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । वरणगाव शहरातील १२ वर्षीय मुलीला बोदवड रोडवर नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ११ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी १२ एप्रिलला वरणगाव येथे तीन जणांविरूद्ध पोस्कोचा गुन्हा दाखल झाला.
अधिक माहिती अशी की, अल्पवयीन मुलीच्या घराशेजारी राहणारा संशयित मजिद शहा हमीद शहा याने मुलीला तुझ्याशी काम आहे, असे सांगून दुचाकीवरून बोदवड रस्त्याने नेले. मात्र, गाडीचे पेट्रोल संपल्याने मुलीला एकटीच सोडून तो निघून गेला. काही वेळाने त्याचे दोन मित्र पिंपळगावकडून आले. त्यांनी संबंधित मुलीला तुला मजिदने बोलावल्याचे सांगितले. तिने नकार दिल्यावर मजिद स्वत: तिथे येऊन मुलीला रस्त्याच्या पलिकडे घेऊन गेला. तेथे तिच्यावर अत्याचार करून निघून गेला. तर त्याचे दोन अल्पवयीन मित्र हे रस्त्यावर लक्ष ठेवत उभे होते. गुन्ह्याचा तपास एपीआय आशिषकुमार आडसुळ करत आहेत.