जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२४ । भुसावळसह जळगावमार्गे मुंबई-पुणे कडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच भुसावळ विभागातील गाळण रेल्वे स्थानकावर रेल्वेने १३ सप्टेंबरपासून ब्लॉक घेतला असून यामुळे भुसावळ मार्गे धावणाऱ्या १२ एक्स्प्रेस व मेल गाड्या रद्द करण्यात आल्या.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरी-भुसावळ खंड दरम्यान गाळण स्थानकावर अप व डाउन लूप लाईन्सचा विस्तार करण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी विशेष ब्लॉक शुक्रवार दि. १३ पासून घेण्यात आला आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणार्या १२ एक्स्प्रेस व मेल गाड्या रद्द करण्यात आल्या.
या गाड्या रद्द?
शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी नागपूर-पुणे एक्स्प्रेस रद्द, १४ रोजी पुणे-नागपूर एक्स्प्रेस रद्द, १३ व १४ रोजी अमरावती-पुणे एक्स्प्रेस, पुणे-अमरावती एक्स्प्रेस, ईगतपुरी-भुसावळ मेमू, भुसावळ-ईगतपुरी मेमू, देवळाली-भुसावळ मेमू, भुसावळ-देवळाली मेमू, बडनेरा-नाशिक विशेष गाडी, नाशिक-बडनेरा विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे. रेवा-मुंबई विशेष गाडी गुरुवार, १२ सप्टेंबरला रोजी तर मुंबई-रेवा विशेष गाडी शुक्रवार, १३ सप्टेंबरला रोजी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी या ब्लॉकची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.