जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीण मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या माघारीचा आज (दि. ४) दुपारी ३ वाजेपर्यंत शेवटचा दिवस होता. आज माघारीच्या दिवशी जळगाव ग्रामीण मतदारसंघात १७ पैकी ६ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला असून यामुळे आता ११ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून एकूण १७ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यापैकी अनिता सुनील सोनवणे, निलेश सुरेश चौधरी, रियाज सादिक देशमुख, प्रतापराव गुलाबराव पाटील, योगेश एकनाथ कोळी, मुकेश मूलचंद कोळी या ६ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

त्यामुळे आता रिंगणात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव रघुनाथ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून गुलाबराव देवकर, मनसेचे मुकुंदा आनंदा रोटे, हिंदुस्थान जनता पार्टीचे किशोर मधुकर झोपे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण जगन सपकाळे, तर अपक्ष म्हणून गुलाबराव रघुनाथ पाटील, प्रसाद लीलाधर तायडे, भगवान दामोदर सोनवणे, भरत देवचंद पाटील, शिवाजी महाराज हटकर आणि सोनी संतोष नेटके अशा ११ जण निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button