पाणी भरण्याच्या बहाण्याने १० वर्षीय मुलीला घरात बोलावले, त्यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायकच..

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२३ । पाणी भरण्याच्या बहाण्याने १० वर्षीय मुलीला घरात बोलवून एका तरूणाने तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी काय आहे घटना?
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १० वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आई-वडीलांसह वास्तव्यास आहे. रविवारी दुपारी ३ वाजता तिला एका तरूणाने पाणी भरण्याच्या बहाण्याने घरामध्ये बोलविले. यानंतर घराचा दरवाजा बंद केला, वाईट उद्देशाने मुलीचे अंगावरील कपडे काढून तिचे अंगावर चादर टाकून तिच्यासोबत अंगलटपणा करत तिचा विनयभंग केला.

हा प्रकार मुलीच्या कुटूंबियांना कळाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार तरूणाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.