ऐन सणावारात भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० रेल्वे गाड्या रद्द
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । ऐन सणावारात भुसावळ विभागातून धावणाऱ्या अप-डाउन मार्गावरील १० गाड्या रद्द झाल्या आहेत. मनमाड-दौंड सेक्शनमध्ये दुहेरी लाइन नॉन इंटर लॉकिंगची कामे होणार आहेत. त्यामुळे ब्लॉक घेण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे तुम्ही अशात कुठे रेल्वेने जाण्याचे नियम करत असाल तर आधी रद्द झालेल्या गाड्यांची माहिती घेऊन जा.
या गाड्या रद्द?
११०४१ दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ही गाडी (२७ ते २९ सप्टेंबर, १,४,५,६ व ८ ऑक्टाेबर), साईनगर-दादर (२५,२८,२९,३० सप्टेंबर व २,५,६,७,व ९ ऑक्टाेबर), पुणे-अमरावती एसी (२८ सप्टेंबर व ५ ऑक्टाेंबर), अमरावती-पुणे ही गाडी दर गुरुवारी सुटते. ती २९ सप्टेंबर व ६ ऑक्टाेबर, पुणे-काझीपेठ एक्स्प्रेस ही गाडी दर शुक्रवारी सुटते. ती ३० सप्टेंबर व ७ ऑक्टाेबरला रद्द आहे. काझीपेठ-पुणे एक्स्प्रेस ही गाडी दर रविवारी सुटते.
ती २५ सप्टेंबर व २,९ ऑक्टाेबर, पुणे-अजनी एक्स्प्रेस ही गाडी दर शनिवारी असते. ती १ ऑक्टाेबरला रद्द असेल. अजनी-पुणे एक्स्प्रेस दर रविवारी सुटते. ती २५ सप्टेंबर व २ ऑक्टाेबर, पुणे-अजनी एसी एक्स्प्रेस दर शुक्रवारी असते. ही गाडी ३० सप्टेंबर व ७ ऑक्टाेबरला धावणार नाही. अजनी-पुणे एसी एक्स्प्रेस दर मंगळवारी सुटते. ही गाडी २७ सप्टेंबर व ४ ऑक्टाेबरला रद्द करण्यात आली आहे.