जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० गाड्या रद्द, तर दोन गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. झाशी येथील रेल्वे स्थानकावर इंटरलॉकिंगच्या कामामुळे या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे.
या गाड्या रद्द?
रद्द केलेल्या गाड्यांमध्ये १२५९७ गोरखपूर-मुंबई साप्ताहिक एक्स्प्रेस २१ डिसेंबर, मुंबई-गोरखपूर एक्स्प्रेस १५ व २२ डिसेंबरला.
१२१०३ पुणे-लखनऊ साप्ताहिक एक्स्प्रेस २१ डिसेंबर, १२१०४ लखनऊ-पुणे एक्स्प्रेस २२ डिसेंबर.
११४०७ पुणे-लखनऊ साप्ताहिक एक्स्प्रेस २१ डिसेंबर, ११४०८ लखनऊ-पुणे एक्स्प्रेस १६ व २३ डिसेंबर.
२२१२१ लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ साप्ताहिक एक्स्प्रेस १८ डिसेंबर, २२१२२ लखनऊ-एलटीटी एक्स्प्रेस १९ डिसेंबर.
०९४६५ अहमदाबाद-दरभंगा साप्ताहिक एक्सप्रेस १७ डिसेंबर, तर २२१२२ दरभंगा-अहमदाबाद एक्स्प्रेस २० डिसेंबर रोजी रद्द केली आहे. या गाड्या संबंधित दिवशी प्रस्थान स्थानकापासूनच सुटणार नाहीत.
या गाड्यांच्या मार्गात झाला आहे बदल
१२१४४/१२१४३ सुलतानपूर-एलटीटी-सुलतानपूर ही १४ व २१ डिसेंबर रोजी सुलतानपूर वरून सुटणारी गाडी झाशी, ग्वाल्हेर, भिंड, ईटावा, कानपूर मार्गे वळवली आहे. १५०६६ पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस ही गाडी ११ व १३ आणि १५ तसेच १७, १८ व २० व २१ डिसेंबर रोजी पनवेलवरुन सुटणारी गाडी झाशी, ग्वाल्हेर, भिंड, ईटावा-कानपूरमार्गे वळवली आहे.