शनिवार, सप्टेंबर 16, 2023

किराणा दुकान फोडून केली १ लाख ३० हजार रुपयांची रोकड लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज| ७ ऑगस्ट २०२३। भुसावळ तालक्यातील साकेगाव येथील तरूणाचे किरणा दुकान फोडून दुकानातून १ लाख ३० हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुनहा दाखल करण्यात आला आहे.

सोपान रामा बाविस्कर (वय-३८) रा. श्रीराम नगर, साकेगाव ता. भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून किराणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, सदगुरू प्रोव्हिजन नावाने असलेले दुकान सोपान बाविस्कर याने ३१ जुलै रोजी रात्री १० वाजता बंद केले होते. अज्ञात चोरट्यो बंद किराणा दुकान फोडून आत प्रवेश करत ड्रावर मध्ये ठेवलेले १ लाख ३० हजार रूपयांची रोकड चोरून नेली.

हा प्रकार १ ऑगस्ट रोजी सकाळी पहाटे ३ वाजता उघडकीला आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सोपान बाविस्कर याने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहे.