२५ लाखासाठी ३२ वर्षीय विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । चोपडा तालुक्यातील आडगाव येथील माहेर असलेल्या ३२ वर्षीय विवाहितेला फ्लॅट घेण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणावे म्हणून सासरच्या मंडळीने तिचा छळ केला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील आडगाव येथील माहेर आलेल्या पूनम पाटील यांनी फ्लॅट घेण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये आणावे यासाठी २००९ पासून आजपर्यंत सासरच्या मंडळींनी माहेरी आणि सासरी राहटणी, पुणे येथे छळ केला. पैसे आणण्यास नकार दिल्याने मारहाण व दमदाटी करण्यात आली. पूनम पाटील यांच्या फिर्यादीवरून पती जितेंद्र पांडुरंग पाटील, सासू मंगलाबाई पाटील, जेठ संदीप पाटील रा.नाशिक यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण गाडीलोहार करीत आहे.