⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

हिंदू एकजुटीचा आविष्कार दर्शवणारी सनातनची ‘हिंदु एकता दिंडी’ !       

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या 80 व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने  19 मे या दिवशी सायंकाळी 5 वाजता शहरात ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. पद, पक्ष, संघटना, संप्रदाय बाजूला सारून केवळ ‘हिंदू’ म्हणून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिक, हिंदुत्ववादी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले. सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. जळगाव येथील श्री श्री १००८ प.पू. सरजू दासजी महाराज (फलाहारी) यांच्याहस्ते धर्मध्वज पूजन करत नेहरूचौक येथून दिंडीला प्रारंभ झाला. पौरोहित्य श्री. नंदू शुक्ल गुरुजी यांनी केले. टॉवर चौक, चित्रा चौक या मार्गे शिवतीर्थ मैदान येथील चौकात समारोप झाला. शेवटी उपस्थितांना सनातनचे सद्गुरू नंदकुमार जाधव, ह.भ.प. वरसाडेकर महाराज यांनी संबोधित केले. दिंडीचे ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले.


सहभागी संघटना

इस्कॉन, योग वेदांत समिती, जय गुरुदेव, चैतन्य संप्रदाय, वारकरी संप्रदाय, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान, हिंदू राष्ट्र सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान, हिंदु जनजागृती समिती


स्वसंरक्षण प्रात्यक्षिके

टॉवर चौक, चित्रा चौक, कोर्ट चौक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यात लाठीकाठी, दंडसाखळी, कराटे यांची प्रात्यक्षिके सादर झाली. तसेच विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने दांडपट्टा, लाठी यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.


 दिंडीत संत, क्रांतिवीर आणि राष्ट्रपुरुष यांच्या वेशभूषा केलेल्या आणि प्रभावी संदेश देणाऱ्या बालकांचे पथक सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा केलेले अश्वपथक, मशालधारी, मावळे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, स्वसंरक्षण प्रात्यक्षिक पथक, ढोल पथक, श्रीराम रथ, वारकरी पथक, कलश, तुळसधारी महिला पथक, ध्वज पथक, प्रथमोपचार पथक, शिरसोली येथील लेझीम पथक, लाडली, धरणगाव आणि चाळीसगाव येथील वारकरी पथक, इस्कॉन रथ, यावल येथील झान्ज पथक, नशिराबाद येथील वीर भगतसिंग मर्दानी खेळ आखाडा, योग वेदांत समिती रथ