बातम्या
हनुमान जयंतीच्या भंडाऱ्यांमुळे वांग्यांची रेकॉर्ड ब्रेक विक्री
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । हनुमान जयंती निमित्त्त जळगाव शहरात विविध ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे वांग्यांची चांगलीच झाली. तब्बल २० क्विंटलची वाढ नाेंदवली गेली.हनुमान जयंतीच्या भंडाऱ्यांमुळे शनिवारी जळगाव बाजार समितीत सध्या नियमित हाेणारी भाजीच्या वांग्यांची विक्री दुप्पट झाली. मेथी, पालक, पाेकळा या पालेभाज्यांची अावक उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागताच कमी हाेत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्यावर आली आहे. मेथी केवळ ८ क्विंटल, पालक ५ क्विंटल, पाेकळा २ क्विंटल आवक शनिवारी झाली. त्यासाेबत शेवग्याचा हंगामही संपल्यात जमा असल्याने गेल्या पंधरवड्यात २० ते २५ क्विंटल आवक हाेणारा शेवगा अवघा ३ क्विंटल बाजारात येत आहे. त्यामुळे पाच रुपयांपासून मिळणारा भाव १० रुपये किलाे मिळत आहे. |