सावद्यात गांधी चौक मंडळाच्या भव्य २२फूट गणेशाचे दणक्यात स्वागत!

ऑगस्ट 22, 2022 12:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । जिल्ह्यासह ग्रामीण भागात यंदा कोरोनानंतर प्रथमच सर्वच गणेश मंडळे बापाचे स्वागता साठी सज्ज झाले आहेत. सावदा येथील सर्वात जुन्या अश्या गांधी चौक मित्र मंडळाचे लाल बहादूर गणेश मंडळाने यंदा चिंतामणी गणेशाची भव्य अशी २२फुटी मूर्ती स्थापने साठी आणली आहे. काल रविवारी या मूर्तीचे सावद्यात आगमन झाले.

jalgaon 83

येथील बस स्थानक परीसरातील दुर्गा माता चौका पासून या भव्य दिव्य अश्या मूर्तीची दणक्यात भव्य स्वागत करण्यात आले, यानंतर मूर्तीस तेथून गांधी चौका पर्यंत मुख्यमार्गाने वाजतगाजत आणण्यात आले. यावेळी युवकांनासह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी मूर्तीचे स्वागत करण्यात आले, संभाजी चौकात देखील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, रेखा राजेश वानखेडे व त्यांची कन्या सिमरन वानखेडे यांनी या चिंतामणी गणेशाचे पूजन करून स्वागत केले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी हे देखील उपस्थित होते, छोट्या मारूती व्हेने वर ठेवलेल्या तोफे द्वारे मूर्तीवर पुष्पवृष्टी देखीक करण्यात आली. यावेळी युवक नागरिकांनी गणपती बाप्पा मोरया चा जयघोष केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now