सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी प्रशासनाचा अनोखा उपक्रम

एप्रिल 11, 2022 8:16 PM
जळगाव लाईव्ह न्यूज। ११ एप्रिल २०२२।  अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांना त्यांच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती व्हावी यासाठी शासन विविध माध्यमांचा वापर करुन प्रसिद्धी करण्यात येते.. याचाच भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने एलईडी व्हॅनच्या माध्यमातून योजनांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. या योजनांची माहिती घेऊन लाभार्थ्यांनी योजनांचा  लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

  जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने अनुसूचित जाती उपयोजनेमधून सामाजिक न्याय विभागाकडील योजनांची प्रसिद्धी व्हॅनद्वारे करण्यात येत आहे. या व्हॅनला पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारीअभिजित राऊत, समाज कल्याणचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा माहितीअधिकारी मकुंद चिलवंत  आदी उपस्थित होते. 

 या चित्ररथावर स्वाधार योजना, रमाई आवास, सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, मिनी ट्रक्टर आदि योजनांची माहिती देण्यात आली आहे. सोबतच विविध योजनांच्या ऑडिआ  आणि व्हिडीओ जिंगल्स जाहिराती आणि माहिती पत्रिकेव्दारे देखील प्रसिध्द करण्यात येणार आहे. 

पालकमंत्री jpg webp

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now