सलग 16 व्या दिवशी दिलासा ! ‘हे’ आहेत आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

एप्रिल 22, 2022 10:06 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा देण्याची प्रक्रिया शुक्रवारी सलग 16 व्या दिवशीही सुरूच राहिली. देशातील तेल कंपन्यांनी आज 22 एप्रिल रोजी तेलाच्या किमतीत कोणतेही बदल केले नाहीत. यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र मागील काही दिवसापूर्वी झालेल्या दरवाढीनंतर पेट्रोल १० रुपयाने महागले होते.

petrol diesel

कंपन्यांनी जारी केलेल्या दरांनुसार आज जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर 121.69 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर 104.34 रुपये इतका आहे.राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर 7 एप्रिलपासून स्थिर आहेत. अशा स्थितीत वाहनांच्या इंधनाच्या किमतीत महागाईचा फटका बसलेल्या जनतेला पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल न झाल्याने थोडासा दिलासा जाणवत आहे.

बड्या शहरातील दर
मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये एवढा आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.30 रुपये असून, डिझेल 104. 30 रुपयांवर पोहोचले आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे.

गेल्या महिन्यात जळगावमध्ये पेट्रोलचा दर 111.29 रुपये प्रति लिटर इतका होता, त्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल दर सलग वाढत गेले. 1 एप्रिलला पेट्रोल 117.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचले होते. तर 6 एप्रिलपर्यंत वाढत ते 121.69 पोहोचले. तेव्हापासून पेट्रोल दर स्थिर आहे. एका महिन्यात पेट्रोल जवळपास 10 रुपयाने महागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now