जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बु ता. एरंडोल जि. जळगाव या संस्थेने एरंडोल व धरणगाव या तालुक्यात पथनाट्याद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा माहिती कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्यायाच्या योजनांचा जागर समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या कलावंतांनी धरणगाव व एरंडोल या दोन्ही तालुक्यात मिळून एकूण 14 गावात करण्यात आला या जागर अभियानाअंतर्गत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या शासनाच्या अशा बऱ्याच योजना आहेत ज्या जनसामान्य ग्रामीण भागाच्या लोकांना माहिती नाही म्हणून त्या योजना या दुर्लक्षित केल्या जातात व त्या योजनांचा कोणीही लाभ घेत नाही पण पथनाट्य या प्रभावी माध्यमातून संस्थेच्या कलावंतांनी त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या
या पथनाट्य कार्यक्रमाप्रसंगी अनेक गावातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,तलाठी व ग्रामस्थांची संस्थेला मोलाची मदत झाली . समर्थ संस्थेचे अध्यक्ष योगेश लांबोळे , भावेश पाटील , शुभम सपकाळे, विशाल सदावर्ते, तेजस कोठावदे , कृष्णा बारी, जयेश सोनवणे, उमेश चव्हाण, अक्षय पाटील, महेश कोळी, समायरा ढोले यश अहिरराव ,रवी परदेशी , महेश कोळी, प्रदीप कोळी हे कलावंत पथनाट्य सहभागी झाले. संस्थेचे सचिव विशाल जाधव तसेच जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत साहेब व विनोद पाटील साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.