समतानगरात सट्टापेढीवर छापा, तिघांना अटक

एप्रिल 9, 2022 8:42 PM

crime 1 1 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । शहरातील सट्टा, जुगार गेल्या काही दिवसांपासून बंद असला तरी पुन्हा सट्टापेढी सुरू होऊ लागल्या आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने समतानगर परिसरात छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी दिलीप शिरसाट यांना शहरातील समता नगर परिसरात सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस कर्मचारी रवींद्र मोतीराया, महेश महाले, आकाश माळी, कल्पेश गायकवाड, आकाश शिंपी यांच्या पथकाने समतानगरात त्या सट्टा पेढीवर छापा टाकला.

पथकाने केलेल्या कारवाईत सोहन रमेशलाल जैन, रमेश देवचंद गोपाळ, सागर दिलीप कासार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांच्याकडून २६५० रुपये ताब्यात घेतले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now