⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

शेतकऱ्यांने लक्ष द्या : राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ५० हजाराच लाभ

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२३ । नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अश्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी राज्य सरकारने ७०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमाफीची योजना राज्य सरकारकडून राबविली जाते. नियमित कृषी कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा आहे. लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. अहामदन पीक कर्जाची पर्णतः परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ दिला जातो.

यापूर्वी त्यातील २,३५० कोटी रुपये हे १६ सप्टेंबर २०२२ रोजी वितरित करण्यात आले होते तर ६५० कोटी रुपये हे १८ ऑक्टोबर २०२२ रोजी वितरित करण्यात आले होते. आता ७०० कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याचा अर्थ आतापर्यंत ३७०० कोटी रुपये राज्य सरकारने वितरित केले आहेत. आता एक हजार कोटी रुपये वितरित करणे बाकी आहे.