शिवाजीनगरात प्रौढाने गळफास घेत संपविले जीवन

ऑगस्ट 17, 2021 3:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या खडके चाळमध्ये राहणाऱ्या एका ४५ वर्षीय प्रौढाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

Untitled design 9 jpg webp

शिवाजी नगरातील खडके चाळ परिसरात मंगल प्रताप पाटील वय-४५ हे परिवारासह राहतात. खासगी वाहन चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवीत होते.  मंगळवारी सकाळच्या सुमारास घरातील सर्व सदस्य बाहेर गेले असताना त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळाने शेजारी राहणारा एक व्यक्ती गाडी घेण्यासाठी आला असता त्याला घडलेला प्रकार दिसून आला. शहर पोलिसांना घटनेची  माहिती कळताच राजेंद्र परदेशी व बशीर तडवी यांनी घटना स्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात  हलविला. याप्रकरणी शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजून आलेले नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now