⁠ 
सोमवार, मे 20, 2024

वादळी पाऊस व गारपिटीने चाळीसगाव तालुक्यातील फळबागा व रब्बी पिकांचे कोट्यवधींचे नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे, बहाळ, टेकवाडे, ढोमणे, बोरखेडा बु. पिराचे येथे आमदार मंगेश चव्हाण यांनी  प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, कृषी अधिकारी साठे साहेब व महसूल – कृषी विभागाचे कर्मचारी यांच्यासोबत वादळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांची व फळबागांची पाहणी केली. शेतकऱ्यांची उभी पिके व फळबागा जमीनदोस्त झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. 

दि.२० मार्च रोजी पहिली गारपीट झाली त्याचदिवशी आमदार मंगेश चव्हाण यांनी अवघ्या काही तासात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देत पंचनाम्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या, मात्र नंतर दि. २१, २२ व २३ मार्च रोजी सलग तीन दिवस वादळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीत अजून भर पडली.

सदर पाहणी प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अनिल गायकवाड, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, नंदकुमार पाटील यांच्यासह बहाळ येथील भीमसिंग परदेशी, कैलास बोरसे, अनिल पाटील, आसिफ मणियार, गुलाब पाटील, टेकवाडे येथील सरपंच वाल्मिक पाटील, सचिन पाटील, अभिमन्यू पाटील, लक्ष्मण पाटील, गोविंद परदेशी, ढोमणे येथील ग्रामपंचायत सदस्य वासुदेव पाटील, भाऊसाहेब पाटील, सुनील पाटील, भगवान सोनवणे, बापू पाटील, तरवाडे येथील पोलीस पाटील जीवन पाटील, ज्ञानेश्वर दरेकर, नारायण गवळी, लोटन पावले, ललित मराठे, बोरखेडे बु पिराचे येथील शांताराम पाटील, राजू पाटील, अरुण पाटील, देविदास पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते.

आधीच अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजाला खचला आहे, एकीकडे वीजवितरण कंपनी शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडत आहे तर दुसरीकडे बोगस बियाण्यांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्नच आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता उभे करणे गरजेचे असून शासनाने भरीव स्वरूपात मदत जाहीर करावी अशी अपेक्षा आहे.

मी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आग्रही असून युद्धपातळीवर पंचनामे तालुक्यात सुरू आहेत. लवकरात लवकर पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करावा यासाठी प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनादेखील शेतकऱ्यांची झालेली अवस्था निदर्शनास आणून देणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

यांच्या नुकसानीची केली पाहणी…

आमदार मंगेश चव्हाण यांनी महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह कारभारी रामराव देवरे यांची बहाळ येथील शेवगा बाग, ज्ञानेश्वर सूर्याजी पाटील यांची बहाळ येथील केळी बाग, अनिल रमेश पाटील यांची बहाळ येथील निंबू बाग पाहणी केली तर  टेकवाडे येथील शंकर गोपीचंद भिल, झगा अर्जुन निकुंभ यांच्या घरांची पडझडची पाहणी केली तर  टेकवाडे येथीलच साहेबराव तुळशीराम पाटील यांच्या नुकसान झालेल्या शेवगा बागेची पाहणी देखील त्यांनी केली.