⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोदवड | राजीव गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त लोणवाडी येथे संपूर्ण गावात फवारणी

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त लोणवाडी येथे संपूर्ण गावात फवारणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ ।  भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे मास्क, सँनिटायझर किट व फळवाटप करण्यात आले. त्यानंतर लोणवाडी येथे संपुर्ण गावात सँनिटायझर फवारणी करण्यात आली.

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या 47 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधत सकाळी 11 वाजता ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे रुग्णांना सँनिटायझर, मास्क व फळवाटपाचा कार्यक्रम युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश  पाटिल यांच्या ऊपस्थितीत पार पडला. शहरातील डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पीटल असलेल्या ग्रामीण रुग्णालयात प्रथम रुग्णांना चहा व बिस्किट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर मास्क सँनिटायझर व फळांचा कँरेट रुग्णांना वाटण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या वैदयकीय अधिक्षकांच्या ताब्यात देवुन कोरोना रुग्णांना वाटप करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ अमोल गिरी व डॉ. शर्मा यांनी आभार व्यक्त केले.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीवरुन लोणवाडी येथे संपूर्ण गावात सँनिटायझर फवारणी करण्यात आली. यावेळी गावातील प्रत्येक प्रभागात मास्क वाटप करण्यात आले. गावात मास्क व सँनिटायझरचे महत्त्व पटवून देत युवक काँग्रसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांचेकडून कोरोनाविषयक जनजागृती करण्यात आली. काही दिवसां अगोदर सापडलेले पॉझिटिव्ह रुग्ण विना तपासणीचे गावात मोकाट फिरत असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश  पाटील यांनी आरोग्य अधिकारी डॉ अजय सपकाळ यांना संपर्क साधत सदरील प्रकार लक्षात आणून दिला. आमदार चंद्रकांत  पाटिल यांच्याकडून टेस्टिंग किट ऊपलब्ध झाल्याने तपासणी शिबिर मोहिम बळकट करणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ अजय सपकाळ यांनी कळविले.

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेशदादा पाटील, माजी सरपंच संतोष देठे, माजी सरपंच मोहन देठे, ग्रामपंचायत सदस्य शेख रियाज अब्दूल नबी, अजाब ठेकेदार, माजी ग्रामपंचायत सदस्य रविंद्र महाले, मुकेश चौधरी, रोजगार सेवक दसरथ राऊत, आशा सेविका छाया राऊत, सविता साळवी, अंगणवाडी मदतनीस आशाबाई साळवी, अंगणवाडी मदतनीस पंचफूला देठे, अंगणवाडी सेविका शकुंतला राजपूत, अंगणवाडी सेविका निर्मला पिसे, ऊर्मिला देठे, ऊमेश बिजागरे, गजानन पाटिल, बंटी जावरे, अमोल व्यवहारे यांच्यासहित अन्य ग्रामस्थ ऊपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.