⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

रब्बी हंगामासाठी पाटाला आर्वतन सोडा : शिवसेना

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । विविध मागण्यांसह रब्बी हंगाम पिक घेण्यासाठी पाटाला लवकारात लवकर आर्वतन सोडण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रब्बी हंगाम सुरु झाला असून रब्बी हंगामात पिक घेण्यासाठी पाटाला लवकारात लवकर आर्वतन सोडण्यात यावे. पाटचाऱ्या दुरूस्त करण्यात यावे, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाटाला आर्वतन सोडणे. रब्बी हंगाम घेण्यासाठी किमान ५ आर्वतन सोडण्यात यावे. हे सर्व विषय आपण गिरणा प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठकीत विषय घेवून ताबडतोब मंजूरी घेवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवदेनावर गुलाबराव वाघ, निलेश चौधरी, धिरेंद्र पुरभे,शरद माळी,राजेंद्र ठाकरे, योगेश वाघ, भागवत चौधरी,भरत महाजन, पप्पू कंखरे, लक्ष्मण माळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.