महाराष्ट्रवाणिज्य

मोठी बातमी : जून महिन्यात देशात वाहन विक्रीत झाली १९ टक्क्यांची वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । एकाद्या वाहनाच्या निर्मितीमध्ये सेमीकंडक्टर चिपचे महत्व खूप जास्त असते. मात्र याचा पुरावठा गेल्या काही दिवसांपासून होत नव्हता. मात्र आता पुरवठ्याच्या परिस्थितीत सुधारणा झाल्याने सरलेल्या जून महिन्यात प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत १९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे वाहन निर्मात्यांची नेतृत्वदायी संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स ने बुधवारी दिली.

आधी माहिती अशी कि, आकडेवारीनुसार, निर्मात्यांकडून सरलेल्या जून महिन्यात २,७५,७८८ वाहने वितरकांकडे पोहोचवण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यात (जून २०२१) २,३१,६३३ वाहने वितरकांकडे धाडण्यात आली होते. याच कालावधीत १३,०८,७६४ दुचाकींची विक्री करण्यात आली. याच कालावधीत । १०,६०,५६५ दुचाकी विकल्या गेल्या होत्या. तर तीन चाकी। वाहनांच्या विक्रीत तिपटीने वाढ होत ती २६,७०१ वर पोहोचली आहे.

जी गेल्या वर्षी ९, ४०४ तीन चाकी वाहनांवर मर्यादित होती. जूनमध्ये सर्वच प्रकारच्या वाहनांची किरकोळ विक्री १६,११,३०० वाहनांवर पोहोचली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत १३,०१,६०२ होती. करोनाकाळात जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर चिपच्या पुरवठ्यात टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे मागणी असली तरी उत्पादकांना वाहनांचा पुरवठा करता येत नव्हता.

विक्री ११,५६८ युनिट्स इतकी नोंदवण्यात आली होती. त्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये ११,५११ युनिट्स व्हॅन्सची विक्री झाली आहे. व्हॅन्सच्या विक्रीत किंचित घट झाली आहे. तर दुचाकींची विक्री मात्र 15 टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल २०२२ मध्ये ११,४८,६९६ इतक्या टू व्हीलर्सची विक्री झाली आहे.

Related Articles

Back to top button