जळगाव जिल्हाराजकारण

मुक्ताई मंदिर हे पवित्र स्थळ ; राजकारण न आणता जपावे पावित्र्य

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । आदिशक्ती मुक्ताबाईचे मंदिर हे लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी कोणीही राजकारण करू नये. मुक्ताबाई मंदिराचे पावित्र्य राखावे, असे आवाहन मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी पत्रकार परीषदेत केले.

संस्थानमध्ये भ्रष्टाचार नाही
संत मुक्ताबाई संस्थानचा कारभार हा चॅरीटी कमिशनर बुलढाणा यांच्याकडे असून कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा विषय नाही. संस्थेमार्फत विविध विकासकामे केली जातात. ज्यात पंढरपूर येथील मठ, विविध शैक्षणिक संस्था, 24 तास अन्नदान अशा प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दानपेटी संदर्भात केलेले वक्तव्य ऐकून वाईट वाटले. संत मुक्ताई संस्थानसाठी आमदारांनी निधी आणावा, असे आवाहन करत मुक्ताई मंदिराला दरवाजाच नाही, ताटी उघडा ज्ञानेश्वरा … हे मुक्ताबाईचे ब्रीद वाक्य आहे, असा टोला आमदार पाटील यांना त्यांनी लगावला. याप्रसंगी हभप उद्धव जुनारे महाराज, पंकज महाराज उपस्थित होते.

माझ्या वक्तव्याचा विर्पयास : आमदार चंद्रकांत पाटील
शनिवार, 17 सप्टेंबर रोजी झालेल्या पत्रकार परीषदेत काही पत्रकार मित्रांनी शब्दाचा विपर्यास करून बातमी प्रसिद्ध केली असून आदिशक्ती मुक्ताई कोथळी मंदिर परीसराचा शासनाच्या तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजने अंतर्गत विकास होत असताना ज्या शासकीय निधीमधून जुने मुक्ताई मंदिर परीसरात तुळजा भवानी मंदिर, विठ्ठल मंदिर व मल्टीपर्पज हॉलचे बांधकाम झालेले असून या मंदिरात असलेल्या दानपेट्या व त्याच्या बाजूला असलेले मल्टीपर्पज हॉलची येणारी देणगी यातून मंदिराची व हॉलची देखभाल दुरुस्ती साठी सदरचा निधी वापरला गेला पाहीजे परंतु तसे न होता दोन्ही मंदिराच्या दानपेट्या व सभागृहाच्या देणगी स्वरूपातील निधी हा एका विशिष्ट व्यक्तीकडे जातो हे माझ्या माहितीत आहे. काही पत्रकारांनी या शब्दाचा विपर्यास करून मुक्ताईच्या दानपेट्या अशा शब्दांमध्ये वृत्त छापले, परंतु माझे वारकरी व तीर्थक्षेत्र मुक्ताई संस्थान ची बदनामी होईल असा कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही, असे आमदारांनी कळवले आहे.

‘त्या’दानपेटीतील निधी विशिष्ट व्यक्तीकडे
भविष्यात या तीर्थक्षेत्र पक्षहसरातील जो काही दानपेट्यातील निधी असेल यातून मंदिराची व सभागृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करण्यात यावा हा माझा प्रामाणिक व शुद्ध हेतू आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून तुळजाभवानी मंदिर व विठ्ठल मंदिरातील दानपेट्यातील पैसे एका विशिष्ट व्यक्तीकडे जात असल्याचा हा संतापजनक प्रकार थांबवला पाहिजे ही माझी व असंख्य वारकर्‍यांची प्रामाणिक इच्छा आहे तीच मी बोलून दाखवल्याचे आमदारांनी कळवले आहे. या ठिकाणी जास्तीत -जास्त तीर्थक्षेत्र पर्यटन विकास निधीतून कामे व्हावी यासाठी मी प्रयत्नशील आहे. मी आदिशक्ती मुक्ताईचा वारकरी असल्यामुळे मला मुक्ताई प्रती मोठी श्रद्धा असल्याचे आमदारांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

Related Articles

Back to top button