जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हा बडतर्फ झाला पाहिजे. आणि या वर अशी कारवाई झाली पाहिजे कि,दहा पिढ्या आठवण झाली पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करा अशी मागणी केली. यावेळी अजित पवार पाचोरा येथे सभेत बोलत होते. “हा कोण बकाले नावाचा माणूस, त्याला लाज, लज्जा, शरम आहे कि नाही? पोलीस ऑफिसर असला म्हणजे काय झालं, त्याला काय शिंगं आली काय? का त्याला मस्ती आलीय? अशा शब्दात अजित पवारांनी संताप व्यक्त केला. याच बरोबर मी आहे, मी आहे करणारे मुख्यमंत्री बकालेंच्या बाबतीत काय भूमिका घेतात ते बघतोच असेही अजीत पवार म्हणाले.
“आपल्या जळगाव जिल्ह्यात कोण बकाले नावाचा माणूस आहे, त्याला लाज, लज्जा, शरम आहे का नाय? आमच्या महाराष्ट्रातील एकाही समाजाच्या बद्दल कोणाला काही बोलण्याचं कारण नाही, आम्ही काही असे तसे माणसं नाहीत, हे लक्षात ठेवा, त्या बकालेच्या बाबतीत, ज्या पद्धतीने तो मराठा समाजाच्या बद्दल आक्षेपार्ह पद्धतीने बोलला आहे, त्याला ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे, त्याला दहा पिढ्या आठवण झाली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
मराठा समाजाचा वाढता प्रक्षोभ लक्षात घेत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल देत निलंबनाचे आदेश पारित केले आहेत.