महाविकास आघाडीचे ‌ 20 ते 22 आमदार लवकरच बाहेर पडणार ; शिंदे गटातील नेत्याचा गौप्यस्फोट

फेब्रुवारी 12, 2023 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२३ । राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप घडून आला होता. तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह अपक्षच्या तब्बल ५० आमदारांनी अडीच वर्षांपासून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधून काढता पाय घेतला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळली आणि शिंदे गट व भाजपने सोबत येऊन सरकार स्थापन केले.

mahavikas aghadi jpg webp

राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाच्या शिवसेनेसह इतर पक्षातील अनेक नेते-पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र अशातच आता लवकरच महाविकास आघाडीचे 20 ते 25 आमदार बाहेर पडणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट शिंदे फडणवीस सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय.

अलीकडेच आमदार बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीमधील 10 ते 12 आमदार माझ्या संपर्कात आहेत म्हटले आहे यावर सामंत यांना विचारले असता त्यांनी माझ्या संपर्कात आहेत तर 8 ते 10 व बच्चू कडू असे मिळून 20 ते 22 आमदार आमच्या सोबत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत उपस्थित होते. यावेळी सांमत बोलत असताना वीज तोडणीवर बोला, असे ओरडत सामंतांच्या भाषणावेळी उपस्थितांनी‌ गोंधळ घातला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now